WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अलंकार

१] शब्दालंकार२] अर्थालंकार
उदा : यमक , अनुप्रास इ .उदा : उत्प्रेक्षा ,रुपक इ

१] शब्दालंकार :- जेव्हा शब्दांतील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते ,तेव्हा ‘ शब्दालंकार ‘ होतो

२] अर्थालंकार :- जेव्हा काव्यपंक्तीत योजलेल्या शब्दामुळे अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते तेव्हा ‘अर्थालंकार ‘ होतो

१] उपमेय :- ज्याची तुलना करायची ते .
२] उपमान :- जिच्याशी तुलना करायची ते

उदा : १] आंबा साखरेसारखा गोड आहे .
यथे आंब्याची तुलना गोड साखरेशी करायची आहे म्हणून ‘आंबा ‘ हे येथे ‘उपमेय ‘ झाले व त्याची तुलना गोड साखरेबरोबर करायची आहे ,’गोड साखर ‘ हे ‘उपमान ‘झाले

वरील वाक्यात ‘आंबा ‘ व ‘साखर ‘ या दोन वास्तूतील सामान गुणधर्म ‘गोडपणा ‘आहे . म्हणहून येथे गोडपणा हा ‘समानधर्म ‘झाला . त्याचबरोबर तो समानधर्म ‘सारखा ‘ या शब्दाने दाखवला आहे म्हणून ‘सारख ‘शब्द याठिकाणी ‘साम्यवाचक शब्द ‘झाला

अशा प्रकारे ‘अर्थलन्कारात ‘ उपमेय ,उपमान ,समान ,साम्यवाचक शब्द यांना महत्व असते

कृती :- खालील उदारणातील उपमेय ,उपमान ,साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा .
अ ] आईचे प्रेम सागरासारखे असते
आ] आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत .
इ ] राधाचा आवाज कोकिळासारखा मधुर आहे .

क्रउपमेयउपमानसाधर्म्यदर्शक शब्दसमान गुण
१]आईसागरसारखेप्रेम
२]सरपंचकर्णसारखेदानशूर
३]राधाकोकिळासारखामधुर आवाज
१] उपमा अलंकार :-

उदा :- १] सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरि !

१]उपमेय२]तुझा रंगउपमानपावसाळी नभ
३]सामन धर्म४]रंगसाधर्म्यवाचक शब्दरी
वरील उदरहरनाथ ‘ तुझा रंग ‘ हे उपमेय आहे व ‘पावसाळी नभ ‘ उपमान आहे . व ‘पावसाळी नभाची ‘ उपमा ‘तुझ्या रंगाला ‘ दिली आहे . म्हणून येते ‘उपमा ‘हा अलंकार झाला आहे .

उदा :- २] कमलापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात .

वरील उदाहरणात उगवणाऱ्या व मावळणाऱ्य दिवसाला ,उमलणाऱ्या व मिटणाऱ्या कमळाची उपमा दिली आहे . म्हणून येथे उपमा अलंकार झाला आहे

उपमा अलंकाराची व्यख्या :- दोन वास्तूतील किंवा कृतीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन करुन सांगितले जाते तिथे उपमा अलंकार होतो . या अलंकारात ‘सम ,समान ,सारखे ,वाणी ,जैसे ,तैसे ,प्रमाण ,सदृश्य ,परी ‘ यासारखे शब्द वापरले जातात .

२] उत्प्रेक्षा अलंकार :-

उदा : १] हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हला .

१]उपमेयआंबा२] उपमानसाखर
३]साधर्म्यवाचक शब्दजणू४]साधर्म्यगोडपणा
वरील वाक्यात आपणास असे दिसून येते कि उपमेय हे उपमान आहे . म्हणजे आंबा हा केलीली असते तेव्हा आहे आंब्याची व साखरेची गोडी एकाच आहे असे समजते .

उत्प्रेक्षा अलंकाराची व्याख्या :-

उपमेय हे जणू उपमान आहे अशी जेथे कल्पना केलीली असते तेव्हा ‘उत्प्रेक्षा’ अलंकार होतो . या अलंकारात ‘जणू ,काय ,जेवि , गमे ,भासे ,वाटे ,की ,जसे ‘ यासारखे शब्द येतात .