WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वाक्यप्रचार

भाषेत असे काही शब्द वा शब्दसमूह येतात की त्याचं शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही : रूढीनें किंवा परंपरेने त्यानं स्वतःचा असा वेगळा अर्थ प्राप्त झालेला असतो ; व तोच भाषेत रूढ होऊन बसतो . अशाप्रकारचे शब्दशः होणाऱ्य अर्थपेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन आलेल्या शब्द्समहूला “वाक्यप्रचार “ असे म्हणतात .

उदा :-
१] ढुथडी भरुन वाहने – ओसंडून वाहने
२] तहानभूक हरपणे – कामात मग्न होणे
३] हिरमोड होणे – नाराज होणे
४] उन्नत होणे – विकसित होणे
५] पोटाची पूजा करणे – जेवणे ,खाणे
६] फरफट होणे – गैरसोय होणे
७] कुरकुर करणे – तक्रार करणे
८] पोटभर मार खाणे – भरपूर मार खाणे
९] नजराणा पाठवणे – मौल्यावान भेट वाटणे
१०] काळजाला घरे पडणे – प्रचंड दुःख होणे

११] स्फुंदून स्फुंदून रडणे – हुंदके देऊन रडणे
१२] अंगावर काटे येणे – प्रचंड भीती वाटणे
१३] मनमानी करणे – मनाला वाटेल तसे वागणे
१४] हैराण होणे – त्रासून जाणे
१५] कानोसा घेणे – चावूल घेणे
१६] पसार होणे – पळून जाणे
१७] हितगुज करणे – मनातल्या गोष्ठी सांगणे
१८] आवाहन करणे – विनंती करणे
१९] अंगावर तुटून पडणे – जोराचा हल्ला करणे
२०] घाव सोसणे – दुःख सोसणे