{1} १} विधानार्थी वाक्य {२} प्रश्नार्थी वाक्य
[३]उदगारार्थी वाक्य [ ४] आज्ञार्थी वाक्य
[५] केवलवाक्य [ ६] मिश्र वाक्य
[७] संयुक्त वाक्य
{1} विधानार्थी वाक्य :- केवळ विधान करणे हाच बोलणाऱ्याचा उदेश असतो या वाक्यत बोलणाऱ्यला काहीतरी सांगायचे असते .हे बोलताना त्याच्या मनात दुसरा कसलाच हेतू नसतो तेव्हा अशा प्रकारच्या सर्व वाक्यांना विधानार्थी वाक्य म्हणतात
उदा – :-[१] पांढरा ढग वरवर जात होता
[२] ग्रंथानीच मला आसरा दिला
{२} प्रश्नार्थी वाक्य :- ज्या वाक्यातून साधे विधान केलेले नसून प्रश्न विचारला जातो तसेच विचारणाऱ्यला काही ना काही माहिती हवी असते अशा प्रकारच्या सर्व वाक्यना प्रश्नार्थी वाक्य म्हणतात
उदा – :- [1] या घराचे मालक कोण ?
[2] तुम्हांला कुठे जायचे आहें ?
[३] उदगारार्थी वाक्य :- एखादया गोष्ठीतील भव्यवता ,अतोनातता ,कल्पना आधिक खुलवून दाखवण्यासाठी वाक्यात त्या भावनेचा उदगार काढलेला असतो ,अशा प्रकारच्या वाक्यांना उदगारार्थी वाक्य म्हणतात
उदा – :- [1] अरेरे ! केवढा मार बसला आहें त्याचा डोक्याला !
[2] अहो ! पिवळ्या कंठाची चिमणी !
[4] आज्ञार्थी वाक्य ;- ज्या वाक्यात अज्ञा ,वनांती ,हुकूम ,अथवा इच्छा व्यक्त केलीली असते ,त्या सर्व वाक्यांनाआज्ञार्थी वाक्य म्हणतात .
उदा – :- [1] मुलांनो ,व्यायाम करा
[2] तू त्याच्या बरोबर जा
[5] केवलवाक्य :- ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकाच विधेय असते ,त्यास केवलवाक्य म्हणतात
उदा – :- [1] अभय दररोज व्यायाम करतो
:- [2] शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला
[6] मिश्र वाक्य :-एकापेक्षा अधिक वाक्यअसतात , त्यातील एक वाक्य मुख्य किंवा प्रधान असते तर दुसरे गौण म्हणजे कमी महत्त्वाचे असते दोन्ही वाक्य उभयाणवी अव्यय यांनी जोडलेली असतात
उदा – :- [1] सर म्हणाले ,सर्वांनी नियमित अभ्यास करावा
:- [2 ] जो आवडतो सर्वांना ,तो आवडतो देवाला
[7] संयुक्त वाक्य :- दोन केवल वाक्ये उभयान्वयीअव्ययांनी जोडली असता एक जोडवाक्य तयार होते ,त्यांस संयुक्त वाक्य म्हणतात
उदा – :-[1] मनाली पहाटे उठते {आणि }तासभर अभ्यास करते
[2] संदेश संध्यकाळी मैदानावर खेळतो {किंवा }आईबरोबर देवळात जातो