नामावरून जसे त्याचे लिंग समजते तसेच त्या नामाने दर्शवलेली वस्तू एक आहे ,कि त्या वस्तू एकाहून आदिक आहेत हेही कळते . नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्यात एक धर्म आहे ,त्यास ‘वचन ‘ असे म्हणतात . वचन म्हणजे . आपण एका वास्तूबद्दल बोलत आहोत यावरून वाचनाचे दोन प्रकार पडतात
१] एकवचन
२] अनेकवचन
१] एकवचन :-
नामाच्या रुपावरुन जेव्हा एका वस्तूचा बोध होतो ,तेव्हा ते त्याचे एकवचन असते
उदा :-
मासा ,गाय ,झाड ,मी ,तो ,ती ,पुस्तक ,मुलगा ,पाटी ,इमारत इ .
२] अनेकवचन
नामाच्या रुपावरुन जेव्हा एकापेक्षा आदिक संख्येचा बोध होतो .तेव्हा ते त्याचे अनेकवचन असते
उदा :-
मासे ,गाई ,झाडे ,आम्ही ,त्यानं ,पुस्तके ,मुलगे ,पाट्या ,इमारत इ .
उदा :-
१] तलवारी – तलवारी
२] सवय – सवयी
३] धडा – धडे
४] तोरण – तोरणे
५] सोपा – सोपे
६] बगळा – बगळे
७] वाद्य – वाद्ये
८] टोक – टोके
९] संधी – संध्या
१०] वस्ती – वस्त्या