WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कथालेखन

पुढील मुद्दयांवरून कथालेखन करा.
मुद्दे : एक राजा — त्याची प्रजा आळशी बनली होती – -त्यांना उदयोगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो — रस्त्यांत मधोमध दगड ठेवतो — सोन्याची नाणी असलेली पिशवी — अनेक लोक जातात , पण दगड उचलत नाहीत — एक गरीब माणूस तो उचलतो —
पिशवीतील नाणी मिळतात — लोकांना हे कळते — लोक उदेयोगी बनतात —

आळशी प्रजा

उत्तर :

रामनगर नावाचे एक राज्य होते . राजा रामचंद्र तिथे राज्य करत होता . राजा अत्यंत हुशार आणि कर्तव्यदक्ष होता . राजाची प्रजा मात्र सर्व सुखसोई उपलब्ध असल्यानी आळशी बनली होती . राज्याची हि स्थिती पाहून राजा विचारात पडला . राज्यातील जनतेला उदेयोगी बनवण्यासाठी राजाने एक युक्ती केली . राजाने आपल्या नोकराकरवी रस्त्याची मधोमध एक भला -मोठा दगड ठेवला . त्या दगडाखाली त्याने सोन्याची नाणी असलेली पिशवी ठेवली आणि वेशांतर करून तो तिथे नजर ठेवून उभा राहिला .
रस्त्याने दिवसभरात अनेक लोक गेले . साऱ्यांनी दगड ठेवणाऱ्याला दूषणे दिली ;
पण दगड हटवण्याचा प्रयत्न मात्र कोणीही केला नाही .
संध्याकाळी झाली तरीही तो दगड तिथेच होता . शेवटी एक गरीब माणसाला हा दगड दिसला . त्याने हातातील सामान बाजूला ठेवले आणि जोर लावून तो दगड बाजूला सरकवला . दगडाखाली पिशवी त्याच्या नजरेस पडली . त्यानी ती उघडून पाहताच त्याला अत्यानंद झाला . आत सोन्याची नाणी होती . त्या गरीबाची गरिबी कायमची संपली होती . राज्यतील इतर लोकांना कळताच त्याना पश्चताप झाला . स्वतःची चूक सगळ्यांच्याच लक्षात अली . त्या दिवसापासून राज्यतील सर्व लोक उदेयोगी बनले आणि रामचंद्र समाधानी झाला .

तात्पर्य : आळस माणसाचा शत्रू असतो.